औरंगाबाद: जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधीना नारळीबागेत अधिकारी-कर्मचारी व लोकप्रतिनिधीना नारळीबागेत क्वॉटर्स दिलेले आहे. तेथे त्यांच्या सेवेचा कालवधी संपलेला आहे. तरीसुद्धा त्यांनी ते रिकामे करुन दिले नसल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
अनेक कर्मचार्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. काही सेवानिवृत्त तर काही मयत झालेले आहे तरीसुद्धा त्यांना दिलेले क्वार्टर त्यांनी रिकामे करुन दिलेले नाही म्हणून नव्याने ज्या कर्मचार्यांना सदर क्वार्टर हवे आहे त्यांची अडचण झाली आहे. सदर क्वार्टरमध्ये बेकायदा निवास करणार्या लोकामार्फत विज पाणी बिलसुद्धा भरल्या जात नाही त्याचे बील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागालाच भरावे लागते. त्यांनी या घरांवर अतिक्रमणच केले असल्याने ते रिकामे करावे असे वेळोवेळी सांगण्यात आले तरी सुद्धा त्यांनी रिकामे न केल्याने त्यांना आता नोटीस बजावल्या आहे. सदर नोटीसनुसार अंमलबजावणी न केल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागामार्फत कळविण्यात आले आहे.